धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील बालसाहित्यिक व बालसाहित्य“ या प्रकल्पाअंतर्गत सर्व बालसाहित्यिकांचा परिचय आपला जिल्हा आणि महाराष्ट्रालाही व्हावा या उद्देशाने त्या संदर्भातील सर्व माहिती एकत्रित करणे आणि त्यांच्या बालसाहित्याची महाराष्ट्रभर ओळख करून देणे हा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेने हाती घेतला आहे. या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील बालसाहित्य आणि बालसाहित्यिक असा ग्रंथ प्रकाशित करायचा आहे.
त्यासाठी मूळ धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या बालसाहित्यिकांनी आपला थोडक्यात परिचय, पासपोर्ट साईज फोटो, आपण जे बालसाहित्य लिहिले असेल त्यातील आपणास योग्य वाटणारी एखादी बालकविता, एखादी बालकथा किंवा आपण जे बालसाहित्य लिहिलेले आहे ते धाराशिव तालुका संयोजक - आनंद वीर (92708 73000) , तुळजापूर - कविता पुदाले (88569 29225),उमरगा, लोहारा - कमलाकर भोसले ( 94224 66910), कळंब, वाशी - अश्रूबा कोठावळे ( 94033 91734), भूम - शंकर खामकर (94232 31972), परांडा - आबासाहेब घावटे (98908 29775) यापैकी आपल्या संबंधित तालुका समन्वयक यांच्याकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जमा करावे असे आवाहन अ भा बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा धाराशिवचे अध्यक्ष युवराज नळे, राजेंद्र अत्रे, डॉ अभय शहापूरकर, कार्यवाह समाधान शिकेतोड, उपक्रम प्रमुख डॉ बालाजी इंगळे आणि सर्व कार्यकारिणी मंडळाने केले आहे.