धाराशिव (प्रतिनिधी) -क्रीडा क्षेत्राविषयी जागरूकता वाढली असली तरी जागरुकता केवळ ग्रेस गुण किंवा 5 टक्के आरक्षण पुरतेच मर्यादित असून खेळाडूंच्या भवितव्यासाठी ऑलिंपिकचे ध्येय ठेवत सराव करणे आवश्यक असून त्यांना पालकांनीही पाठबळ देणे महत्त्वाचे असल्याचे मत गोरक्षनाथ खरड यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या आर्चरी रेंजवर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्ही बी घोडके होते. यावेळी धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष उद्योजक गुलचंद व्यवहारे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, तालुका क्रीडा संयोजक राजेश बिलकुले, क्रीडा भारतीचे गणेश जळके, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप राठोड, तांत्रिक समिती अध्यक्ष नितीन जामगे, सचिव कैलास लांडगे, अल्लाउद्दीन सय्यद, सचिन कोकीळ आदीसह खेळाडू पालक संघ मार्गदर्शक व्यवस्थापकांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धा इंडियन, रिकर्व्ह आणि कंपाउंड राउंड मध्ये 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील मुले मुली धनुर्धरात घेण्यात आल्या. स्पर्धेतून नांदेड येथे होणाऱ्या लातूर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील धनुर्धरांची निवड करण्यात येणार आहे.