धाराशिव (प्रतिनिधी)-  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यर्थिनिची सरळ सेवा भरती मधून धाराशिव जिल्हा परिषद मध्ये नुकतीच निवड झाली होती. आता पुन्हा एकदा याच  सिव्हिल विभागाचा विद्यार्थी सुमित दशरथ भोसले याची महाराष्ट्र शासन अंतर्गत जलसंपदा विभाग नागपूर मंडळामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. मागील पाच वर्षांमध्ये महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पाटबंधारे पी.डब्ल्यू.डी, वॉटर रिसोर्स, नगरपरिषद, जिल्हा परिषद यासारख्या शासकीय तसेच विभागांमध्ये  व 100 हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

सुमित भोसले या विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण शहरातीलच छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाले असून अभियांत्रिकीचे शिक्षण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये घेतले आहे. सदरील निवडी बाबत सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की सद्या शासकीय नोकऱ्या मध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढले असून ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे .

तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  व परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी मागील दहा वर्षापासून तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र कार्यरत आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.  या केंद्राच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, कार्यकारी अधिकारी यासारख्या मोठ्या हुद्द्यावर निवड झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी शासकीय नोकऱ्यांमध्ये दिसतील अशी आशा व्यक्त करतो. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील , संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह  पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे,  विभागाचे विभाग प्रमुख शितल पवार व सर्व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.


 
Top