भुम (प्रतिनिधी)- येथील श्री गुरुदेव दत्त हायस्कूलच्या भव्य मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगट हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्री गुरुदेव दत्त हायस्कूलचा संघ तालुक्यातून प्रथम क्रमांकाने विजयी झाला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी भूम तालुक्यातून त्यांची निवड झालेली आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्रीमान मिसाळ आप्पा व जयंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमान दत्ता भालेराव सर, पर्यवेक्षक श्रीमान सतीश रावजी देशमुख व प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका श्रीमती मुंडे मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला. संस्था अध्यक्ष श्रीमान व्यंकटराव मोटे व सर्व संचालक मंडळ यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.