तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापुरात माजी नगरसेवक सुनील रोचकरी तसेच त्यांच्या पत्नी प्रियांका रोचकरी यांच्यावतीने शहरात पंधरा ठिकाणी झोके बांधण्याचा उपक्रम करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये माजी नगरसेवक सुनील रोचकरी, प्रियांका रोचकरी यांनी कासार गल्ली, साळुंके गल्ली, शुक्रवार पेठ यासह विविध भागात 15 झोके महिलांसाठी नागपंचमीनिमित्त बांधलेले आहेत. महिलांना पारंपारिक झोके खेळण्याचा आनंद मिळत आहे. तुळजापूरकरांना विशेषतः महिलांना, मुलींना नागपंचमीनिमित्त झोके खेळण्याचा आनंद मिळत आहे. पारंपारिकपणे झोके शहरात रोचकरी यांनी बांधलेले आहेत.