तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तहसीलदार तथा व्यवस्थापक, श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या तहसिलदार तथा व्यवस्थापक पदाचा पदभार श्रीमती माया माने तहसिलदार (संगायो)जि.का.बुलढाणा  यांनी बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजो श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन स्विकारला. पदभार स्विकारताच त्यांचे स्वागत मंदीरचे धार्मिक  सहाय्यक व्यवस्थापक तथा लेखापाल सिध्देश्वर इंतुले यांनी त्यांचे स्वागत केले. 

श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर चे व्यवस्थापक तथा तहसिलदार  सोमनाथ माळी यांची  बदली झाल्याने  त्यांचा रिक्त  पदावर  श्रीमती माया माने यांची नियुक्ती करण्यात  आली होती. श्रीमती माया माने यांनी पदभार स्विकारल्या. नंतर श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे यांनी त्याचा बुके देवुन स्वागत केले. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान च्या व्यवस्थापक पदाचा पदभार स्विकारणा-या माया माने या दुसऱ्या तरुण महिला अधिकारी आहेत.श्रीतुळजाभवानी  मंदीर संस्थान चे प्रशासकीय   व्यवस्थापक पद माना बरोबर कामाचे आहे. या पुर्वीचे प्रशासकीय अधिकारी सोमनाथ माळी यांचा कार्यकाल तितकसा समाधानकारक नसल्याने त्यांना नऊ महिन्या नंतर त्याची इतरञ बदली केली असुन ते कायम स्वरुपी नाँटरिचेबल राहत असल्याने नाँटरिचेबल व्यवस्थापक  अधिकारी म्हणून ते प्रसिध्द झाले होते.


श्रीमती माया माने समोर आव्हानांचा डोंगर !

श्रीमती माया माने यांच्या समोर प्रमुख आवाहन प्रशाद योजनेतंर्गत श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर विकास कामे वेळेत करणे आहे. तसेच आगामी शारदीय नवराञोत्सव शांततेत निर्विघ्नपणे पार पाडणे. या  बरोबर भाविकांना समान सुलभ दर्शन घडवणे. मंदीरातील बेशिस्त वातावरण दूर करणे. यासह अनेक आवाहन त्यांच्या समोर असुन ते हे आवाहन कसे पेलतात यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा केला जाणार आहे.

 
Top