धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील श्री साई श्रद्धा एज्युकेशन च्या वतीने चालवण्यात येत असलेल्या मुलींच्या वस्तीगृहासाठी शहरात अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या नामवंत टी.पी.एस. पब्लिक स्कूल कडून शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आले.

शहरातील टी.पी.एस. पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री मोरे व्ही. एम. सर यांनी श्री साई श्रद्धा एज्युकेशन संचिलत मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन नीट तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयाचे पाच संच भेट दिले. धाराशिव शहरातील अत्यंत माफक फीस मध्ये गरीब व होतकरू मुलींसाठी वस्तीगृह चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यात संस्था अग्रभागी आहे असे  गौरवोद्गार काढले. पालकांनी शालेय स्तरावर असल्यापासूनच मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यास व बेसिक फाऊंडेशन चांगले करून घेतल्यास यशाचे प्रमाण वाढेल असे या प्रसंगी श्री मोरे सर यांनी सांगीतले. श्री साई श्रद्धा एज्युकेशनच्या वतीने नीट ऑनलाइन टेस्ट सिरीज घेतल्या जातात.

 सध्या या टेस्ट सिरीजचा विस्तार चौदा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. या टेस्ट सिरीजच्या मार्फत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेला आहे. याबद्दल श्री मोरे सर यांनी समाधान व्यक्त केले.  या संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन टी. पी. एस. स्कूल ने सामाजिक जाणिवेतून गोरगरीब मुलांना शैक्षणिक कार्यात मदत म्हणून हे शैक्षणिक साहित्य श्री साई श्रद्धा एज्युकेशनला भेट दिलेले आहे. श्री साई श्रद्धा एज्युकेशनला शैक्षणिक साहित्य भेट दिल्याबद्दल संस्थेचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे व संचालिका सौ. उषाताई लांडगे यांनी श्री मोरे सर यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांच्यासोबत स्कूलचे भंडारपाल पाटील व्ही. के. सर, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, राजेंद्र कापसे, प्रकाश पांढरे, ज्ञानू शिंदे, विकास मेटकरी, श्रध्दा लांडगे, श्री साई श्रध्दा मुलींच्या वसतिगृहाच्या संचालिका उषाताई लांडगे उपस्थित होते.


 
Top