तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर लगत असलेल्या खडकाळ गल्ली येथे श्रावणमासा निमित्त रविवार दि 11 ते रविवार दि 18/8/2025 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचे हे दहावे वर्ष आहे. या सोहळ्याचा आरंभ विणा पुजन: श्री. व सौ. कांचन कृष्णा अमृतराव टाळ पुजन: श्री. व सौ. ऐश्वर्या दुर्गेश शिंदे तुलसी पुजनः श्री. व सौ. ऋतुजा लखन छत्रे शिवमहापुराण. प्रतिमा पुजनः श्री. व सौ. वैभवी सागर कदम. मृदंग पुजनः श्री. व सौ. राधा अजब शिंदे. कलशपुजनः श्री. व सौ. प्रिती विरेंद्र रोचकरी. ग्रंथपुजनः श्री. व सौ. अमृता अक्षय करडे. ध्वज पुजनः श्री. व सौ. स्नेहा तेजस सोमाजी गोपुजन स्वाती शिवाजी अमृतराव व्यासपिठ पुजनः श्री. व सौ. आरती केतन मलबा. गो पुजनः श्री. व सौ. स्वाती शिवाजी अमृतराव यांच्या हस्ते होवुन आरंभ होणार आहे.
शिवमहापुराण कथावाचक- ह.भ.प. महाराष्ट्र भुषण प्रतिक्षाताई करडुळे (बीड) या करणार आहेत. दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7.30 ते 11.30 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 12 ते 1 गाथाभजन दुपारी 2 ते 5 शिवमहापुराण सायं 5 ते 6 हरिपाठ सायं. असे असणार आहेत.
रविवार दि. 11/8/2024 विनोदाचार्य ह.भ.प. शंकर महाराज लोंढे नांदेड, सोमवार दि. 12/8/2024, ह.भ.प. प्रा. कुंडलिक महाराजपाटील, धामनगांव, मंगळवार दि. 13/8/2024 ह.भ.प. भरत महाराज शिंदे चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब, बुधवार दि. 14/8/2024 ह.भ.प. ज्ञानेश्वर (माऊली) महाराज पठाडे , गुरुवार दि. 15/8/2024 ह.भ.प.साधवी वैष्णवी सरस्वती दिदि आळंदी देवाची, शुक्रवार दि. 16/8/2024 ह.भ.प. नितीन महाराज जगताप निवळी, शनिवार दि. 17/8/2024 ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी पैठण (संत एकनाथ महाराजांचे वंशज), रविवार दि. 18/8/2024 रोजी सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन ह.भ.प. आकर महाराज साखरे, बीड व होऊन महाप्रसाद सुनिल रोचकरी यांचा होईल.
चला जगु या आनंदाने व्याख्यान वसंत हंकारे सर, युवा व्याख्याते समाज परिवर्तनकार, वसंत हंकारे सर रविवार दि. 18/8/2024 रोजी
सायं. 7.00 वा. काळजाला भिडणारे व्याख्यान विषय: चला जगुया आनंदाने पोठ हसायचय, पोठ अंतरमुख व्हायचय....!! आई-बाप समजुन घेताना
काकडा व गाथा भजन
ह.भ.प. सौ. निलिमा माळी. ह.भ.प. अर्जुन माळी, सासवड तर हभप पांडुरंग महाराज रेड्डी ह.भ.प. विनोद सोजी, ह.भ.प. प्रभाकर (दादा) नाईकवाडी यांच्या मार्गदर्शन खाली हा सप्ताह संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन रणसम्राट संघ खडकाळ गल्ली येथील रहिवाशांनी केले आहे.