तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण वरुन महाराष्ट्रात उद्रेक सारखी परिस्थिती आक्रोश आहे परंतु आरक्षणा वरुन महाराष्ट्रात बांगलादेश सारखी हिंसक परिस्थिती पाऊले मराठे येथे निर्माण होवू देणार नाहीत, उचलणार नाहीत. माञ पन्नास टक्के आतुनच सरसगट मराठ्यांना ओबीसी कुणबी मधुन आरक्षण मिळवुन दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी तुळजापूर येथे पञकार परिषदेत दिला.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले कि, माझ्या विरोधात भाजपचे देंवेद्र फडणवीस यांनी अभियान, टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्याचाच भाग अचानक पणे नारायण राणे, प्रकाश दरेकर यांना मी कुठल्याही आवाहनाची भाषा न वापरतात मला आवाहन देण्याची भाषा करतात.
मी राणेला मराठवाड्यात पाय ठेवु देणार नाही असे म्हटले का? असा सवाल करुन सगळ्यांचा पाठपुरावा करायला मराठे खंबीर आहेत. आम्ही कोणाला मोजत नाहीत असा अप्रत्यक्ष इशारा राणे यांना दिला. मुलींना मोफत शिक्षण कुठे आहे? असा सवाल करुन पुण्यातील मुली आजही 65 हजार, 85 हजार रुपये देवुन शिक्षण घेत असल्याचे सांगितले.