तुळजापूर (प्रतिनिधी)-सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर, विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार बालाजी अमाईन्स चे राम रेड्डी यांना मिळाल्याबद्दल स्नेहबंद परिवाराच्यावतीने मानाचा फेटा व पुष्पगुछ देवुन तसेच विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बालाजी सरोवर येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी पंचायत समिती उप सभापती दत्तात्रय शिंदे, उपसरपंच सुधीर पाटील, स्वप्नील पाटील, गोपाळ वडणे उद्योजक, संतोष जाधव, अमोल पाटील सरपंच सांगवी काटी, रामदास मगर उप सरपंच सांगवी काटी, किरण जाधव देवकुरुळी अग्निशामक दल पुणे, उमेश मगर, बनसोडे, विजय जाधव उपसरपंच पिंपळा बु. व विनोद चुंगे आदीउपस्थितीत होते.