धाराशिव (प्रतिनिधी)- रोजगारासाठी प्रथम प्राधान्य देणारे अशी ओळख असणाऱ्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यर्थिनिची सरळ सेवा भरती मधून धाराशिव जिल्हा परिषद मध्ये निवड झाली आहे. मागील पाच वर्षांमध्ये महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पाटबंधारे पी.डब्ल्यू.डी, वॉटर रिसोर्स, नगरपरिषद, जिल्हा परिषद यासारख्या शासकीय तसेच विभागांमध्ये व 100 हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागाच्या दोन विद्यार्थिनी कु. अस्मिता मेंढे आणि कु. कल्याणी गाठे यांची निवड असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पदावर जिल्हा परिषद करिता निवड झाली आहे. सदरील निवडी बाबत सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, महाविद्यालय नेहमीच खाजगी उद्योग, राष्ट्रीय व  आंतर राष्ट्रीय कंपनी आणि शासकीय नोकऱ्या मध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्या बाबत प्रशिक्षण आणि मदत करत असून महाविद्यालयचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी शासकीय नोकऱ्या मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  व परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी मागील दहा वर्षापासून तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र कार्यरत आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.  या केंद्राच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, कार्यकारी अधिकारी यासारख्या मोठ्या हुद्द्यावर निवड झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी शासकीय नोकऱ्यांमध्ये दिसतील अशी आशा व्यक्त करतो. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह  पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह  पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे,  विभागाचे विभाग प्रमुख शितल पवार व सर्व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.

 
Top