तुळजापूर (प्रतिनिधी) -  केंद्र सरकार आयात  करीत असलेले  सोयाबीन चा  भाव, येथे येईपर्यंत  भाव 7300 रुपये पडतो व स्थानिक शेतकऱ्यांना सोयाबीन ला भाव मिळतो 3800रुपये  यातुन कुणाचे  कल्याण होणार असा सवाल करुन लवकरच राष्ट्रवादीकाँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शन खाली देशातील सोयाबीन  उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठी 

आंदोलन  सुरु  करणार असुन याचा शुभारंभ आई तुळजा भवानी दारातुन शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या  हस्ते करण्याचे नियोजन  असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगट युवती शाखा प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी दिली.

केंद्र सरकार  16000मेट्रीक टन सोयाबीन आयात करीत  असुन हे भारतात येईपर्यंत याचा भाव 7300 रुपये पडतो. आता नवे सोयाबीन येण्याच्या मार्गावर असतानाही सोयाबीन ला भाव येत नसल्याने केंद्र सरकार आयात  करीत असलेले सोयाबीन हे शेतकऱ्यांना मारावे व बडे व्यापारी  अदानी अंबानी यांचे कल्याण होण्यासाठी तर करीत नाही असा सवाल या वेळी केला. आयात सोयाबीन हे सोया प्रोडाँक्ट  कंपन्यान साठी  घ्यायचे व शेतकऱ्यांना संपववायाचे असे यांचे धोरण असल्याचा आरोप यावेळी केला आज जशी सोयाबीन अवस्था आहे तशीच नवीन कांदा आला कि परिस्थिती निर्माण होणार आहे.आपल्या  तालुक्यात सोयाबीन कांदा पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते ते देवाचा भरवशावर शेतकरी घेतात,सोयाबीन ऐकरी खर्च 23000रुपयेअसुन ऐकरी उत्पन्न चार ते पाच क्विंटल होते यातुनशेतक-याच्या हाती काहीच पडत नाही शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे,सोयाबीन ला तीन वर्षापासून भाव नाही कृषी ची सर्वार्थाने माहीती शरदपवार साहेबांना असल्याने त्याचा ऐका पञावर सरकार हलत असल्याने मी या साठी शरद पवारांना परिस्थिती सांगुन यात तुम्ही लक्ष आम्ही शेतकऱ्यांन साठी रस्त्यावर  उतरतो असे सांगणार असल्याचे यावेळी म्हणाल्या .लाडक्या बहीणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा 

शेतकऱ्यांच्या व त्यांच्या कुंटुबाचा कष्टाची  शेतमालाला भाव देवुन किमत करा  म्हणजे त्यांच्या मुलाबाळांचे लग्न होतील लाडकी   बहीण पैसे नसल्याने बिन लग्नाची राहणार नाही असे यावेळी स्पष्ट केले.

 
Top