धाराशिव (प्रतिनिधी) -  राज्यात बालिका मुली व महिला यांच्यावर गाव खेड्यापासून महानगरीय शहरापर्यंत अतोनात छेडछाड, बलात्कार व अत्याचार होत आहेत. मात्र याला आवर घालण्यासाठी सरकार कुठलीच भूमिका घेत नाही. आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी खास शक्ती कायदा केलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत केली नसल्यामुळे नराधमांचे मनोधैर्य वाढवून ते महिलांवर अत्याचार करीत सुटले आहेत. त्यामुळे तात्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी जनजागृती व्हावी म्हणून शिवसेना (ठाकरे) युवती आघाडीच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. 

धाराशिव येथील आर.पी. कॉलेज येथे ही मोहीम आमदार कैलास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, शंकर बोरकर, युवती सेनेच्या लोकसभा विस्तारक स्वाती बोरकर यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत प्रारंभ  करण्यात आला. दरम्यान, यावेळी महाविद्यालयीन युवक व युवतींनी सह्या केल्या.

 बदलापूर येथे बालिकेवर अत्याचार करण्यात आला तर पुण्यामध्ये देखील त्या पाठोपाठ असाच प्रकार पहिले बाबत घडला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील राज्याच्या विविध भागात बालिका मुली व महिलावर सातत्याने बलात्कार व अत्याचार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. याला आळा घालण्यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेसाठी तयार केलेला सुरक्षा कायदा लागू करावा अशी मागणी केली आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना शक्ती कायद्यात महिला व मुली यांच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी कठोर शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

यावेळी आमदार कैलास पाटील, शंकरराव बोरकर, मकरंद राजेनिंबाळकर, अक्षय ढोबळे,  सोमनाथ गुरव, विजय सस्ते, मनिषा वाघमारे,  अँड संजय भोरे, राणा बनसोडे,रवि कोरे आळणीकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. या मोहिमेस महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठा प्रतिसाद दिला. या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे.

 
Top