धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय यशवंत शितोळे हे होते. यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबतचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागप्रमुख आणि धाराशिव जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की,करिअर कट्टा अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेऊन आपल्या करिअरला आकार द्यावा असे ते यावेळी म्हणाले. सदर कार्यशाळेसाठी धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील करियर कट्टा समन्वयक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थी संसदेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
सदर कार्यक्रमासाठी करियर कट्ट्याचे विभागीय सह समन्वयक डॉ. नितीन पडवळ, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पुनम सुतार तालुका समन्वय डॉ. विनोदकुमार वायचळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.सावता फुलसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्वप्नील बुचडे यांनी केले प्रस्ताविक डॉक्टर दत्तात्रेय साखरे यांनी केले तर आभार डॉ. संदीप देशमुख यांनी मानले.