तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी 10 ऑगस्टला माहेर मंगळागौरी महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी महीलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे 10 ऑगष्टला माहेर मंगळागौरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते गौरीच्या आगमनानिमित्त मंगळागौरीचे खेळ आयोजित करण्यात आले होते. मंगळागौरीचा खेळ करणारा एक ग्रुप तेर येथे खेळ सादर करण्यासाठी आला होता. सर्व सख्यांसाठी श्रावणाचा आणि गौरी सणाबरोबर माहेरचा आनंद लुटण्यासाठी झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ तसेच सासु सुनेची गाणी, देवीची गाणी, नृत्य असे भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात आले. माहेर मंगळागौरी महोत्सवाचे संयोजक जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी आयोजन केले होते त्याबद्दल उपस्थित महिलांनी अर्चनाताई पाटील यांचे अभिनंदन केले.

 
Top