धाराशिव (प्रतिनिधी)- वैद्य नवनाथ दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता दुधाळवाडी या ठिकाणी गोसंसद संदर्भातील महत्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस गोसेवक, गो रक्षकांनी उपस्थित राहावे असे वैद्य नवनाथ दुधाळ यांनी कळविले आहे.
दिल्ली येथे नुकतेच जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या अधिपत्याखाली पाच दिवसीय गोसंसद संपन्न झाली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील वैद्य नवनाथ दुधाळ यांना गोसंसद पदाची शपथ देऊन मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलेले आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये गोवंश जतन आणि संवर्धन करण्यासाठी दुधाळ यांनी चळवळ उभी केली आहे.
संपूर्ण देशामध्ये गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी,गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा,गो संवर्धनासाठी प्रत्येक गाईंना प्रतिदिन 100 रुपये प्रमाणे 3000 रुपये महिना शासनाकडून मानधन मिळावे, गावोगावी गोरक्षक समित्या स्थापन करून, वंशाच्या निर्मित उत्पादनावरील जीएसटी बंद करण्यात यावी, गायरान जमिनीचा वापर गोवंश चाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयावर गोसंसदेच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
या बैठकीमध्ये गो संसदेची कार्यकारिणी आणि कार्यप्रणाली निश्चित केली जाणार आहे. या जिल्हास्तरीय बैठकीला गोपालक, शेतकरी यांच्यासह ज्यांच्याकडे गोवंशीय जनावरे नसतील मात्र यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी प्रामाणिक इच्छा आहे अशा समर्थकांना देखील समितीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
सदर जिल्हास्तरीय कार्यशाळा गो सेवालय,निसर्ग उपचार केंद्र, दुधाळवाडी (पांडववाडी) पोस्ट येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव पिन 413525 यांच्याशी संपर्क साधावा. गोसंवर्धन चळवळीमध्ये सहभागी होऊन आपले नाव नोंदणी मो.न.9969313397 वर करावी. अधिक माहितीसाठी शैलेंद्र नावडे (9284274793), सुवर्णा यादव (9975684354), स्वामी इलंजेलीयन (8369083499) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्य नवनाथ दुधाळ यांनी केले आहे.