तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पारधी समाज बांधवांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी अप्पा काळे, रमेश पवार, दशरथ पवार, तानाजी पवार, मच्छिंद्र पवार, विश्वंभर काळे, तानाजी काळे, दत्ता काळे,कांता पवार,सुब्राव पवार, फुलचंद पवार, बबलू पवार, सुरेश पवार व पारधी समाज बांधव उपस्थित होते.