उमरगा (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर हि पालात राहून भटक्या विमुक्ताना भाकरीच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पालातील भटक्यां जवळ अजून आधारकार्डच नाही तर त्यांना आधार कुठून मिळणार आहे. शासनाच्या वतीने भटक्या-विमुक्ता सह समाजातील वंचित बहुजना करिता विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती गरजवंत वंचित व इतर मागास बहुजन समाजा पर्यंत पोंहचत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजना पासून वंचित रहावे लागत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती भटक्यांच्या पाला पर्यंत पोंहचविण्याची सामुहिक जबाबदारी आहे . शासनाच्या विविध योजनांची माहिती भटक्यांच्या पाला पर्यंत पोहचवा. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी केले.
शासनाच्या वतीने इतर मागास बहुजनां साठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आदर्श महाविद्यालय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्कृर्ष बहुजनांचा संकल्प बहुजन कल्याणाचा “ या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड बोलत होते. समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुरेश सावळकर, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, मुख्याध्यापक मोहन राठोड, आशोक नाईक, प्रा. प्रताप कुंडगिरे, आशोक नाईक, सय्यदअल्ली शेख, उपप्राचार्य राम माळगे, गोविंद चव्हाण आदि उपस्थिती होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. दिलीप गरुड म्हणाले कि, स्वातंत्र्यानंतर शासनाच्यावतीने इतर मागास बहुजन प्रवर्गाच्या कल्याणा करिता विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती नसल्यामुळे बहुतांश इतर मागास बहुजन वर्ग शासनाच्या या विविध योजना पासून वंचित आहे. शासनाच्या या विविध कल्याणकारी योजना गरजू पर्यंत पोंहचविण्याची जबाबदारी समाजातील सर्वांनीच घेण्याची गरज आहे.
शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्रा. प्रताप कुंडगीर यांनी केले. प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुरेश सावळकर यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. बालाजी पिडगे यांनी केले. आभार प्रा. डॉ. आप्पाराव गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनि उपस्थित होते.