धाराशिव (प्रतिनिधी)-भुम तालुक्यातील नागरीकांच्या प्रशासन संदर्भातील 158 तक्रारी व अनेक निवेदने प्राप्त झाल्या. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भुम येथील तहसिल कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन करुन संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावणेबाबत सुचना करण्यात आल्या.
भुम तालुक्यातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय भुम व विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि., आगार प्रमुख म. रा. प. म., विविध बँकेचे व्यवस्थापक यांना तात्काळ सुचना देवून सर्व प्रश्न 15 दिवसाचे आत मार्गी लावून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरुपात खासदार संपर्क कार्यालयाकडे सादर करणेबाबत सुचना ही केली. भुम येथील तहसिल कार्यालयात सोयाबिन पिकावरील येलो मोझॅक, आण्णासाहेब पाटील महामंडळ, अंतरजातीय विवाह अनुदान तसेच खरीप पिक कर्ज वाटप, राज्य परीवहन महामंडळ व अन्य शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामाच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीचे निवारण करत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खासदार संपर्क कार्यालयाकडे सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या. तसेच पुढील जनता दरबाराच्या वेळी याबाबतचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी भुम तालुक्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, तालुका प्रमुख श्रीनिवास जाधवर, समन्वयक दिलीप शाळु महाराज, युवा सेना जिल्हा प्रमुख डॉ. चेतन बोराडे, शहर प्रमुख प्रकाश आखरे, विधानसभा युवा सेना अधिकारी प्रल्हाद आडागळे, युवासेना चिटणीस माऊली शाळु, महिला आघाडी प्रमुख जिन्नत मॅडम सय्यद, महिला आघाडी तालुकाप्रमुख उमादेवी रणदिवे, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश मांगले, शिक्षक संघटनेचे कोहीनुर सय्यद, विहीन कदम, बाळासाहेब गुळवे आदीसह सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी तसेच सर्व बँकेचे व्यवस्थापक व प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.