परंडा (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने व उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे 1 ते 15 ऑगस्ट 2024 यादरम्यान शुकवार दि.2 रोजी महसूल पंधरवाडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्या निमित्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परंडा तहसीलचे घनश्याम अडसूळ हे उपस्थित होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा या संस्थेचे प्राचार्य डॉ कदम एस एस , शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, निवासी नायब तहसीलदार विजय बाडकर, महसूल विभाग नायब तहसीलदार उत्करर्षा जाधव, संजय गांधी योजना विभागाच्या नायब तहसीलदार पूजा गोरे, निवडणूक विभाग नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट सांगून आर्थिक तरतूद व या योजनेअंतर्गत काही ठळक वैशिष्ट्ये नमूद केली.यामध्ये प्रशिक्षणासाठी उमेदवाराची आवश्यक पात्रता म्हणून उमेदवार 18 ते 35 या वयाचा असावा . उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी . उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा .उमेदवारांची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता या नावीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी . यासाठी शैक्षणिक र्हतेप्रमाणे प्रशिक्षणार्थ्यांना विद्या वेतन म्हणून बारावी पास असतील त्यांना सहा हजार रुपये प्रतिमा आयटीआय किंवा पदविका प्रशिक्षणार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर व पदवीत्तर प्रशिक्षणार्थ्यांना दहा हजार रुपये प्रतिमाह असे विद्यावेतन देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले . मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये बारावी आयटीआय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील . विविध क्षेत्रात मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या गुणुष्यबळाची मागणी दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील . सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील .सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल . सदर विद्या वेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल . या योजनेमध्ये आस्थापना किंवा उद्योजकासाठी पात्रता म्हणून आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना किंवा उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या दिलेल्या संकेत स्थळावर नोंदणी केली असावी . आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किंवा तीन वर्षे पूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी EPF,ESIC,GST Certificate of incorporation,DPIT व उद्योग आजाराची नोंदणी केलेली असावी.
डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांना या योजने संदर्भात माहिती सांगावी या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाइन क्रमांक१८००१२०८०४० वर संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले .प्राचार्य डॉ एस एस कदम यांनीही सदर योजनेची माहिती सविस्तर सांगितली . यावेळी नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर नायब तहसीलदार पूजा गोरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले या प्रशिक्षणासाठी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.