धाराशिव (प्रतिनिधी) - राज्यामध्ये महिला वरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण चिंता निर्माण झाली आहे.  त्यामुळे लाडकी बहीणीच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महिला काँग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्षा ॲड मनीषा पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.1 ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नवी मुंबई उरण येथील युवतीवर अत्याचार करून खुन केला. तर तिच्या मृतदेहाची विटंबना केल्यामुळे महिला म्हणजे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लाडकी बहीण सुरक्षित कधी असणार ? याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एका 4 वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केला असून दि.1 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे एका विवाहितेवर अत्याचार केला आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून याला जबाबदार कोण आहे ? याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच गुन्हेगारांना पोलिसांची भीती आणि कायद्याचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी उपाय योजना राबवाव्यात. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात महिला सुरक्षा व कायदे याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी जनजागृती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड मनीषा पाटील, जिल्हा उपाध्यक्षा मंजुषा खळदकर, उमरगा तालुकाध्यक्षा संगीता सलगर, कळंब तालुका उपाध्यक्षा सुमती तोरमले, धाराशिव उपाध्यक्षा नागिनी कांबळे, शिलावती देशमुख, शबाना शेख, राजनंदिनी शिंदे, यशोदा पवार, संगीता कटारिया यांच्या सह्या आहेत.

 
Top