धाराशिव (प्रतिनिधी)-प्रहार संस्थापक अध्यक्ष दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांग,विधवा,महिला,शेतकरी,शेतमजूर यांच्या विविध मागण्यासाठी होणाऱ्या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग विधवा महिला,यांच्यासह शेतकरी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रहारचे धाराशिव जिल्हाअध्यक्ष मयुर काकडे यांनी प्रसिदी केले आहे.
यावेळी मयुर काकडे यांनी असे म्हटले आहे कि 9 ऑगस्ट रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी दिव्यागाच्या मानधनात वा करून ते 6000 रुपये करण्यात यावे,विनाअट घरकुल देण्यात यावे. भूमीहिन दिव्यांगाना 1 गुंठा जागा देण्यात यावी, सरकारी जागेमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यांसह शेतकरी शेतमजूर विविध मागण्यासाठी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील सुमारे तिन ते चार लाख कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यामध्ये धाराशिव जिल्हाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा याकरिता धाराशिव जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्ते दिव्यांग, विधवा, परित्यक्ता महिला, शेतकरी, शेतमजूर यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रहारचे धाराशिव जिल्हाअध्यक्ष यांच्यासह बाळासाहेब कसबे (जिल्हासंघटक), बाळासाहेब पाटील (उपाध्यक्ष),महादेव चोपदार (जिल्हासचिव), महादेव खंडळकर (कार्याध्यक्ष), महेश माळी (उपाध्यक्ष), इसाक शेख (उपाध्यक्ष), अभजित साळुंके (प्रसिद्धीप्रमुख), जमीर शेख (शहराध्यक्ष), मनीषा आवटे (उपशहर अध्यक्ष), चित्रा शिंदे (भूम तालुका अध्यक्ष), बाबासाहेब भोईटे( धाराशिव तालुका अध्यक्ष) दिनेश पोद्दार(धाराशिव तालुका समन्वयक), नवनाथ कचार (तालुका संपर्कप्रमुख), मारुती पाटील (तुळजापूर तालुका अध्यक्ष), सूर्यकांत इंगळे (तुळजापूर तालुका संपर्क), श्रीमंत गरड (लोहारा तालुका अध्यक्ष), बाजीराव पाटील (लोहारा तालुका उपाध्यक्ष), मोहम्मद अत्तार (जिल्हा सहसचिव), रमेश ढोबळे (लोहारा उप तालुकाप्रमुख), रामेश्वर मदने (उमरगा तालुकाध्यक्ष), बाबुराव गायकवाड (तालुका संपर्क प्रमुख), अमोल शेळके (परंडा तालुकाध्यक्ष), गणेश शिंदे ( कळब तालुका अध्यक्ष), मारुती वाघमारे (कळंब संपर्कप्रमुख), अनिल मिसाळ (कळंब तालुका समन्वय), बाबा शेख (कळंब तालुका संपर्क), हेमंत उंदरे (वाशी तालुका अध्यक्ष), छाया शेरकर (तालुका महिला अध्यक्ष धाराशिव), कैलास यादव (उपाध्यक्ष कळब) यांनी केले आहे.
तरी ज्या दिव्यांगांना या आक्रोश आंदोलनामध्ये सामील व्हायचा आहे यांनी वरील आपल्या संबंधित विभागातील पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा व मोठ्या संख्येने या आक्रोश आंदोलनामध्ये सामील व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी केले आहे.