धाराशिव (प्रतिनिधी)-येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे इ. 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्याकरिता 'दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना' या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
यामुळे शालेय शैक्षणिक यशस्विता व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक दमदार पाऊल उचलत अभ्यासात कच्चा असलेल्या मुलांकरिता प्रशालेमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक क्षमतानुसार योग्य साहय मिळावे, त्याच्या कमकुवत कडया दूर करण्यासाठी, शाळेच्या विद्यमान पद्धतीत सुधारणा करून अशा उपक्रमांची अंमल बजावणी करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व योजना, साहित्य, सवलत, सुख सोयी, यांची माहिती तज्ञ मार्गदर्शक प्रकाश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या उपक्रमाचे नियोजन,कलाध्यापक शेषनाथ वाघ, केंगार दिपक यांनी केले.अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे कौतुक पालक वर्ग व संस्था पदाधिकारी आणि प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, सर्व पर्यवेक्षकांनी केले.