तुळजापूर (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही राज्यातील मुली  सुरक्षित नाहीत बेरोजगाराना काम नाही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता गंभीर झालेला आहे त्यामुळे हे सरकार हद्दपार करण्याची गरज आहे असे  मत माजीमंञी  मधुकरराव चव्हाण यांनी  सलगरा दिवटी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्याच्या संवाद  मेळाव्यात केले.

यावेळी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की काँग्रेस राजवटीमध्ये सर्व जाती धर्माला न्याय दिला जात होता सर्व योजना गोरगरिबापर्यंत दिल्या जात होत्या. कुसळी गवताचा हा तालुका आपण 1999 पासून नालाबंडिंग, सिमेंट बंधारे, गाव तळे, पाझर तलाव, साठवण तलाव इ. माध्यमातून पाणीमय केला. कृष्णा खोरे तील 21 टीएमसी पाणी आणण्यासाठी विधान भवन सोबतच बाहेरही संघर्ष केला. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही योजना मंजूर केली. आघाडी सरकारच्या काळात कामही सुरू झाले. 2014 पर्यंत 70 टक्के कामे पूर्ण झाली होती. परंतु मागील दहा वर्षांमध्ये आघाडी सरकार नसल्यामुळे योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आपण आघाडी सरकारच्या माध्यमातून गावोगाव सभागृह, सिमेंट रस्ते, गाव जोडणारे रस्ते याबाबत भरीव काम केलेले आहे. 

यावेळी मुकुंदराव डोंगरे,  शिवाजीराव गायकवाड, ऋषिकेश मगर, रामचंद्र ढवळे, बालाजी बंडगर, दादासाहेब चौधरी, आप्पासाहेब पाटील, बबन मुळे, बाळू केसकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी साधू मुळे लक्ष्मण तात्या शिंदे, उत्तम पाटील, बाबासाहेब देवकते, प्रभाकर घोगरे, बाबासाहेब इंगळे, अशोक कंदले, दिलीप सोमवंशी, आप्पा लोखंडे, काकासाहेब शिंदे, संदीप वाघ, विनोद कांबळे, महेश लोमटे, जगन्नाथ नरवडे, देवानंद मस्के, फुलचंद सुरवसे,संतोष मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सलगर येथील जेष्ठ कार्यकर्ते मुर्तीजा पटेल हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब चौधरी यांनी केले. तर सूत्रसंचालन बाळू केसकर यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष  मुळे यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top