तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सिंदफळ येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणारी वाटेची प्रचंड दुरावस्था झाल्याने व वाट बिकट व ओढ्यातुन जाणारी असल्याने हा रस्ता दुरुस्त करुन ओढ्यावर पुल बांधण्याची मागणी मातंग समाज बांधवांनी केली आहे.
सिंदफळ गावच्या पूर्व दक्षिण बाजूस मातंग समाज बांधवासाठी स्मशान भूमी आहे. सदर स्मशानकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेला आहे. तसेच सदर स्मशानभूमीच्या बाजुल ओडा असल्याने मातंग समाजातील व्यक्ती मयत झाला कि त्या मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करणेसाठी प्रेत घेऊन जाताना ओढ्यातील वाहत्या पाण्यातुन जावे लागले. यावेळी प्रचंड अडर्चीी निर्माण होत आहेत. सदर ओड्यावर ये-जा करण्यासाठी पुल बांधकाम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सदरील रस्ता करून पुलाचे बांधकाम त्वरीत करावे व मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.