तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्यच्या याञेच्या आगमन पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजी उफाळुन  आली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर राजकिय पक्ष विविध याञा माध्यमातून मतदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्यच्या यात्रेचे  आगमन बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी  तिर्थक्षेत्र  तुळजापूरात होत आहे. या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बँनर वरुन प्रमुख पदाधिकारी चक्क पक्षाच्या अधिकृत पदाधिकारीचे फोटो वगळत आहेत.

राष्ट्रवादीकाँग्रेस  तालुका वतीने  लावण्यात आलेल्या डिझीटल वर सर्व विविध शाखा सेल अगदी महिला सेलच्या  पदाधिकारींचे फोटो   छापले आहेत .माञ विधानसभा इच्छुक उमेदवार  अशोक  जगदाळेचा फोटो  छापला नाही.  तर याला प्रत्युत्तर म्हणून अशोक जगदाळे यांनी तालुकाध्यक्ष व महिला नेत्या सक्षणा सलगर यांचा फोटो छापले नाहीत. यातुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी तालुकावासियांच्या नजरेस येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तालुका शाखेच्यावतीने शिवस्वराज्य यात्रा स्वागतार्थ पोस्टरवर तालुक्यातील सर्व भागातील पदाधिकारी, त्या-त्या भागातील  नेते यांचे    फोटो छापले आहेत. पण अशोक जगदाळे यांच्या पोस्टवर फक्त नळदुर्ग भागातील आपल्या कार्यकत्यांचे फोटो  छापले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधील अंतर्गत खदखद उफाळुन आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याल्या या विधानसभेची जागा  येण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही अंतर्गत गटबाजी उफाळुन आल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बाबतीत  काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्वाभामानी गद्दार शब्द पक्ष विरोधक का पक्षांतर्गत विरोधकांसाठी !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवारगट च्या शिवस्वराज्यच्या याञेच्या पार्श्वभूमीवर लावाण्यात आलेल्या डिझीटल वर स्वाभीमानी गद्दार या शब्दाचा उल्लेख असुन तो उल्लेख सत्ताधारी साठी का पक्षअंतर्गत पदाधिकारी साठी आहे याची चर्चा चविष्टतेने चर्चिली जात आहे.

 
Top