तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर -ढोराळा रस्त्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी तेर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तेर-ढोराळा रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण यांचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये दोन्ही बाजूंनी 50 ते 100 फुट रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. रस्त्यालगत साईड पट्टीला मुरूम टाकला नाही. तो अपूर्ण आहे. तर या ठिकाणी काम चालू असताना ते काम नित्कृष्ट होत असल्याबाबतची ग्रामस्थांनी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंता जे.ए.मैंदाड यांच्याकडे बोगस व कमी साहित्य निवेदापेक्षा कमी वापरले बाबत केली होती. त्याबाबतची अद्याप चौकशी केली नाही. परत तेच काम दुसऱ्या एजन्सी मार्फत चौकशी करावी व कामाची अंदाजपत्रकाची व झालेल्या कामाचे इस्टीमेंट व एम.बी.रेकॉड तपासणी करावी व झालेल्या बोगस कामाची चौकशी करावी. झालेल्या कामाचे आत्तापर्यंतचे बिल संबंधित ठेकेदार यांना देण्यात येऊ नये. लवकरात लवकर आपले स्तरावरून चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर माजी सरपंच महादेव खटावकर व नागरीकांच्या सहया आहेत.