तेर (प्रतिनिधी)- पर्यटक, अभ्यासक, भाविकभक्त यांची रहाण्याची सोय व्हावी म्हणून 1992 ला बांधण्यात आलेले धाराशिव तालुक्यातील तेर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाला उकीरडयाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे 1992 ला पर्यटक, अभ्यासक यांना रहाण्याची सोय व्हावी म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने विश्रामगृह बांधण्यात आले.या विश्रामगृहात दुसऱ्या मजल्यावर एक व्हीआयपी खोली असून खाली एक मिटींग रूम आहे तर दोन खोल्या रहाण्यासाठी असून एक खोली स्वयंपाकाची आहे.तर विश्रामगृहाच्या समोर पटांगण आहे.परंतू गेल्या पंधरा वर्षांपासून या विश्रामगृहाला उकीरडयाचे स्वरुप आले आहे.विश्रामगृहामध्ये विद्युत वायरींग विविध ठिकाणी खराब झाल्याने विश्रामगृह पूर्णपणे अंधारात असून विश्रामगृहातील चांगल्या प्रकारे आलेली विविध झाडे पाण्याअभावी वाळूत गेली आहेत.सर्वत्र गवत झाल्याने विश्रामगृहाला उकीरडयाचे स्वरूप आले आहे.चक्क विश्रामगृहात जनावरे फिरताना दिसत आहेत.पाटबंधारे विभाग क्रमांक 1 धाराशिव या कार्यालयाअंतर्गत हे विश्रामगृह येते.गेल्या पंधरा वर्षापासून विश्रामगृहाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले नाही.पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी  तेर येथील विश्रामगृहातला आलेले उकंडयाचे स्वरूप कधी घालविणार याकडेच नागरीकांचे लक्ष लागले आहे.

 
Top