तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील आठवडी बाजारात मुरूम टाकण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,तेर येथील आठवडी बाजारात अनेक ठिकाणी पावसामुळे चिखल होत असून त्याचा  बाजारात जाणाऱ्या नागरीकास त्रास होत असून आठवडी बाजारात ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर मुरूम टाकण्यात यावा अन्यथा पुढील आठवड्यात आठवडी बाजारात ठेकेदारास कर वसुली करू दिली जाणार नाही असा इशारा नागरीकानी तेर ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर सचिन देवकते, शिवाजी पडूळकर, अभिजित पडूळकर, रमाकांत लकडे, संजय कोळेकर यांच्या सह्या आहेत.

 
Top