धाराशिव (प्रतिनिधी)-गजेंद्र दादा जाधव मित्रमंडळ आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व शोभायात्रा मौजे वडगाव सि येथे उत्साहात पार पडली.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजेनिंबाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास  पाटील,शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ आप्पा गुरव,नगरसेवक रवी  वाघमारे,पंचायत समितीचे उपसभापती शाम भैय्या जाधव,शिवसेना नेते पंकज भैय्या पाटील यांच्या हस्ते करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी वडगावचे सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुळे,लक्ष्मीकांत हजारे,सुनील पांढरे,बालाजी पवार सर, उत्तम बापु कांबळे,अण्णा पांढरे,विश्वजीत गुरव, तुकाराम वाडकर सर,सूरज वाडकर,प्रमोद चादरे,शुभम माळी,ओंकार माळी,सूरज मुळे,सुधीर वाडकर,विनोद थोरात,सचिन वाघमोडे यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष काका कांबळे,सोमनाथ कांबळे,किशोर शिंदे,आकाश जाधव,भाऊ कांबळे,विशाल चव्हाण,शिवाजी कांबळे,प्रमोद भालेराव,तुषार सगट,अमोल जाधव,दादा कांबळे,नितीन कांबळे,धनाजी जाधव,लखन कांबळे,यांच्यासह गावातील गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top