तुळजापूर (प्रतिनिधी)- लेकरांनी महिलांनी फिरावे का फिरु नये असा सवाल करुन बदलापूर निंदणीय घटना गृहखात्याचे अपयश असल्याचे सांगुन श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करण्यास आमचा विरोध असेल अशी माहीती माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी पञकार परिषद घेवुन दिली.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि, श्रीतुळजाभवानी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करुन कौशल्य विकास विद्यापीठ काढण्याच्या घाट घातला जातो याला पैसा कुठुन येणार असा सवाल यावेळी केला.
रेल्वेमार्गासाठी जमिनी संपादनात शेतकऱ्यांची रोजीरोटी हिरावली जात असताना त्यांच्या जमिनी कवडी मोल दरात कारवाई खाक्या दाखवुन ताब्यात आहेत. आमच्या काळात आम्ही बाधीतांना समाधानकारक मावेजा देत होतो. यांच्या जमिनीना समाधानकारक भाव,द्या त्यांच्या वर अन्याय कराल तर आम्ही पक्ष शांत बसणार नाही असा इषारा दिला. तिर्थक्षेञी कागदावर विकासाचे शेकडो कोटी अक्षरे आहेत पण प्रत्यक्षात विकास झाला नाही. मी पुन्हा येईन आणि विकासाचे थांबलेले चाके सुरु होतील असे शेवटी म्हणाले. यावेळी मुकुंद डोंगरे, रुषी मगर, सुनिल रोचकरी, शिवाजी गायकवाड, अमर चोपदार, तौफीक शेख, धनंजय मगर, अँड. राम ढवळे, शरद जगदाळे उपस्थितीत होते.