भूम (प्रतिनिधी)-सरकारला जाग येण्यासाठी भूम आगारामध्ये दत्त मंदिरात श्री दत्त महाराज यांना आरती करून घटनांनांद आंदोलन भूम आगार संयुक्त कृती समिती च्या वतीने करण्यात आले.

प्रलंबित आर्थिक मागण्याच्या पूर्ततेसाठी 9 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीच्या वतीने करण्यात येणार आहे .एसटी कामगारांच्या या आहेत प्रमुख मागण्या .रा.प. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा , रु.4849/- कोटींमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा, मुळवेतनात दिलेल्या रु.5000/-, 4000/-, 2500/- मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट रु.5000/- द्या , एस.टी. कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा (इनडोअर व आऊटडोअर) त्वरित सुरु करा, सुधारित जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा,  विद्यमान एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटूंबीयांना तसेच सेवानिवृतांना व त्यांच्या पत्नीस सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.या मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

आज भूम आगारात संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळवावे म्हणून व मागील फरकाच्या सर्व रकमा देण्यासाठी व क्रांती दिन ठेवलेले आंदोलनाला यश येण्यासाठी दत्त मंदिर चरणी आरती व घटना नांद आंदोलन करून एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या व नंतर सर्वांना पेढे वाटप केले .यावेळी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top