भूम (प्रतिनिधी)- गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण देशभरात नव्हे तर साता समुद्रा पार लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्साहात साजरी झाला. भूम येथील साठे नगर, लहुजी नगर, परिवहन महामंडळाच्या ठिकाणी जयंती साजरी केली. 

साठेनगर येथील जयंती दरम्यान प्रतिमेचे पूजन सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी केले,  तर ध्वजारोहण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते केले . दरम्यान अनेकांनी शुभेच्छा देताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच प्रबोधन केलं .

यावेळी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात,  भारतीय जनता पक्षाचे भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल,  तालुका अध्यक्ष मुसा शेख , भाजप सरचिटणीस संतोष सुपेकर,  शहराध्यक्ष बाबासाहेब वीर,  चंद्रकांत गवळी, बापू बगाडे,  काँग्रेस आय पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, शिवसेना उबाटा गटाचे तालुका  प्रमुख विधीज्ञ श्रीनिवास जाधवर, जेष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, माजी तालुका प्रमुख अनिल शेंडगे, दीपक मुळे,   माजी सैनिक तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, राजाभाऊ माने,  दीपक पवार, आबासाहेब मस्कर, अमोल सुरवसे, माजी नगराध्यक्ष गौरीशंकर साठे , रिपाईच्या पुणे जिल्हाध्यक्ष रेश्मा शेख,  अश्विनी साठे  आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शंकर खामकर यांनी केले . 

जयंतीच्या यशस्वीतेसाठी जयंती समिती नितीन साठे , सचिन साठे,  किरण साठे आदी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. रमाई नगर भूम येथे साजरा करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक सुनील थोरात सुकाळे बाबूजी विनायक मस्के सर दत्तात्रय पाटोळे जीवन बनसोडे व रमाई नगर येथील बौद्ध बांधव उपस्थित होते.

 
Top