तुळजापूर (प्रतिनिधी) - शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांची तुळजाई नगरीवर शिवछञपतीचा भगवा ध्वज फडकविण्यासाठीची इच्छापुर्ती साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुखमंञी देंवेद्र फडणवीसकडे आग्रही मागणी करुन तुळजापूर विधानसभा मतदार संघ आमच्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य माजीमंञी रामदास कदम यांनी तुळजाई दारी केले. या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
माजीमंञी रामदासभाई कदम यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन सहकुंटुंब दर्शन घेतले. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर मंदिरात पञकारांना बोलताना म्हणाले कि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा ऐकनाथ शिंदे व्हावेत असे साकडे आपण देविला घातल्याचे यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकित येथे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या महायुती कडून उभ्या असताना येथे महाविकास आघाडी उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बावन हजाराचे मताधिक्य मिळाले तेव्हा पासुन या मतदारसंघावर महायुतीतील घटक पक्ष दावा करु लागले आहेत.