तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी राञी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेची पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले नंतर देविजींच्या मंगळवार सांयकाळच्या विविध धार्मिक सेवेत भाविकांप्रमाणे भाग घेतला.

मराठासंघर्षयोध्दा मनोज जरांगे यांनी देविच्या वारा दिवशी राञी दहा वाजत श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आले असता थेट श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात जावुन पुजा अर्चा केली यावेळी पुजेचे पौराहित्य पुजारी कुमार टोले यांनी केले नंतर त्यांनी

महंत तुकोजीबुवांचा मठात जावुन श्रीअन्नपुर्णा देविचे दर्शन घेतले नंतर देविचे महंत तुकोजीबुवा, महंतवाकोजीबुवा यांचे दर्शन घेतले यावेळी महंत वाकोजी बुवा यांनी आता उपोषण करुन नका तुम्हची समाजाला गरज आहे. आरोग्य  प्रकृती सांभाळा असा सल्ला देवुन आशिर्वाद देवुन त्यांचा  देविचा प्रसाद देवुन शाल घालुन सन्मान केला नंतर त्यांनी 

संपुर्ण मंदीरास प्रदक्षणा मारुन देविजीच्या होणाऱ्या  प्रक्षाळ पुजा सेवेत सहभाग नोंदवला यावेळी महंत वाकोजीबुवांनी त्यांना प्रक्षाळ पुजेची माहीती दिली नंतर संपुर्ण  मंदीराला प्रदक्षणा मारली यावेळी दर  मंगळवारी राञी निघणाऱ्या देविजींच्या छबिना पालखी मिरवणूकीत त्यांनी छबिनापालखीला खांदा देवुन देवी चरणी सेवा अर्पण केली नंतर मंदीर परिसरात असणाऱ्या दलित बांधवाचे आराध्य दैवत असणाऱ्या अदिमाय अदिशक्ति मंदीरात जावुन  मातंगी देविचे मनोभावे दर्शन घेतले नंतर ते मंदीरा बाहेर आले.


विधानसभेचे इछुक जरांगे पाटलांच्या स्वागताला

मराठासंघर्षयोध्दामनोजजरांगेपाटील हे मंगळवारी राञी दहा वाजता तिर्थक्षेञ तुळजापूर देवीदर्शनार्थ आले असता त्यांचा स्वागतासाठी भाजपने प्रथमच शहरात सर्वञ स्वागत फलक लावले होते तर छञपती शिवाजी महाराज पुतळ्या माजीमंञी माजीआ मधुकर चव्हाण यांनी स्वागत केले तर भवानी मंदीर जवळ माजी नगराध्यक्षव देवानंद,रोचकरी विनोद गंगणे तर मंदीरात अँड धिरज पाटील यांनी स्वागत करुन त्यांच्या सभेला सर्वसामान्य मराठा बांधवांन उपस्थीतीत दर्शवली.

 
Top