तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे होत असलेल्या  प्रस्तावित विकास आराखडाला विरोध म्हणून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण  आंदोलन मंगळवार दि. 30 जुलै रोजी मंदीर प्रशासकीय कार्यालयासमोर करण्यात आले.

या लाक्षनिक उपोषणात काँग्रेसचे जेष्ट नेते अशोक मगर, माधवराव कुतवळ, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळ अध्यक्ष  विपीन शिंदे, बुबासाहेब पाटील, प्रा धनंजय लोंढे,  नागनाथ भांजी, जीवनराजे इंगळे, राहुल खपले, अमर चोपदार, अमोल कुतवळ, रुषी मगर  अजित क्षिरसागर, दत्ता धुमाळ, श्रीकांत धुमाळ,  विजय भोसले, विशाल रोचकरी, किशोर गंगणे, चिन्मय मगर, विकास शिंदे, शुभम क्षिरसागर, अण्णासाहेब क्षिरसागर, अविनाश गंगणे, रणजित इंगळे, आनंद जगताप, सागर इंगळे, किरण यादव, किशोर गंगणे, एन. डी. शिंदे, राजाभाऊ कदम, लखन शिंदे, विकास शिंदे, अण्णासाहेब मगर, संजय पेंदे, अमोल ताकमोघे, दत्ता क्षिररसागर, विकास शेटे, मयुर कदम, दत्ता सोमाजी अदिनी यात सहभाग नोंदवला.


आमदार पाटील यांची चर्चा 

तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत जाहीर प्रगटन द्वारे विकास आराखडा बाबत आपली मते आणि आक्षेप सुचना 7 दिवसात  श्री तुळजाभवानी मंदिर कार्यालयात किंवा श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ येथे देण्यास सांगितले होते. त्या अनुषगाने आपण दिलेल्या हरकती प्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील व पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांची महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आपण दिलेल्या हरकती बद्दल तसेच पुजारी मंडळाचे दिलेल्या निवेदना संदर्भात सखोल चर्चा झाली.

 
Top