धाराशिव (प्रतिनिधी)- विद्या  निकेतन आश्रम शाळा शिंगोली तालुका धाराशिव येथील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक अब्बासअली नजरुद्दीन शेख (वय 57 वर्ष) यांचे शुक्रवारीच्या पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते माजी पोलीस उपअधीक्षक अंजुम शेख यांचे पती तर सहशिक्षक हबीब शेख यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ ,एक विवाहित बहीण, पत्नी, दोन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

अंत्यविधी शुक्रवारी दुपारी 1:30वाजता पोलीस लाईन स्मशानभूमी करण्यात आला. यावेळी अंत्यविधीस शिक्षण क्षेत्रातील व इतर विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना विविध स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


 
Top