उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आणखी एका तरुणांनी दंड थोपटले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याचें अजयकुमार विष्णू देढे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
शहरातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यानीं ही माहिती दिली. या वेळी विष्णू देढे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना देढे म्हणाले की, विविध चित्रपटात काम करतांना सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले असून चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. तालुक्यातील बळीराजा चेतना अभियानातून पथनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. सर्वत्र पसरलेली बेरोजगारी, शेतकरी,कष्टकरी, कामगार यांच्या हाताला काम देण्यासाठी उपेक्षितांचा आवाज बनून लढाई लढणार असल्याचे ते म्हणाले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू असून उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असून त्यानीं जो आदेश देतील तो मान्य असणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे, यांनी मला लढाईसाठी तयार राहण्यास सांगितले असून सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार असल्याचे ते म्हणाले.