तुळजापूर (प्रतिनिधी)- बांग्लादेश येथील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार तात्काळ थांबवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांच्यावतीने शुक्रवार दि. 9 रोजी तहसीलदार मार्फत माननीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.
हिंदू समाजावर होत असलेला अन्याय हिंदु लोकांची घरे, दुकाने जाळून टाकली जात आहेत महिला वरती अत्याचार होत आहे व हिंदूच्या प्रार्थना स्थळेवर हल्ले केले जात आहे आपल्या देशातील नागरिक हे बांगलादेशमध्ये अडकलेले असून त्यांना त्वरित आपल्या मायदेशी परत आणावे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंदू समाजावर होणारा अत्याचार बंद केला नाही तर बांग्लादेशा सोबत मैत्री संबंध व व्यवहार बंद करावा बांग्लादेशचे दूतावास आपल्या दरबारी बोलवून कडक शब्दात सुनवावे अशा मागणीचे निवेदन माननीय पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे साहेब, युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शरद पवार शरद जगदाळे गणेश ननवरे, रुबाब भाई पठाण, वाहेद भाई शेख, इब्राहिम इनामदार, शहाजी नन्नवरे, अमोल जाधव, संजय देशमुख, राहुल हंगरगेकर,नवनाथ जगताप,आकाश शिंदे,चंद्रकांत डावरे,शहाजी कसबे,तुकाराम जगताप, व्यंकट झाडे उपस्थीत होते.