परंडा (प्रतिनिधी) - दि.6 आगस्ट 2024 अण्णाभाऊ साठे या नावाने जन्मलेले त्यांचे साहित्य संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगात एक अग्रॅगन्य प्रकाश होते. त्यांनी उपेक्षित समुदयांच्या संघर्ष्याना संबोधित करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर केला असे मत प्रा.विजय जाधव यांनी येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा .गे .शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यानात व्यक्त केले. ते या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील जाधव उपस्थित होते.व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला. ते आपल्या मनोगतमध्ये म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या देशामधील सर्व महापुरुषांच्या विचारांची देवाण घेवाण केली पाहिजे व त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे त्यासाठी अवांतर पुस्तके वाचली पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दिड दिवस शाळेत जाऊन बहुजन समाजासाठी आपले साहित्य लिहिले परंतु त्यासाठी त्यांनी समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचार विषयी स्वतः अनुभव घेतला व त्या अनुभवावरून साहित्य लिहिले. कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

 
Top