धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा केंद्रातील विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आणि पदावर रुजू झाल्यावर महाविद्यालयाचे नाव रोशन होईल अशा पद्धतीने कार्य करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अर्थशास्त्र विभागातील एम ए भाग दोन मध्ये शिकत असलेल्या अपर्णा शिंगाडे या विद्यार्थिनीने सरळ सेवा भरती मध्ये जलसंपदा खात्यातील कालवा निरीक्षक या पदी यशस्वीरित्या यश संपादन केले आहे. अर्थशास्त्र विभागातील एम ए भाग 2 चा विद्यार्थी गोविंद कोळी याने सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. भौतिकशास्त्र विषयाचा सागर घुगे यांनी देखील सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याचबरोबर साबीर शेख,राजकन्या वडगणे, विना ठाकूर या विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षेत यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सौ.विद्या देशमुख, प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन पवार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप देशमुख, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती लोंढे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. बालाजी कऱ्हाडे, व स्पर्धा परीक्षा विभागाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या.