धाराशिव (प्रतिनिधी)- सहकारी संस्थांनी लोकाभिमुख होऊन काम करावे. सार्वधर्म फंडाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती काळात आर्थिक मदत करण्यात अग्रभागी राहवे.सहकार संस्थेत रोख स्वरूपाच्या व्यवहारा ऐवजी धनदेशाद्वारे व्यवहार करणे ही चांगली बाब आहे असे प्रतिपादन लोकसभा मतदारसंघ धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.
ते भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म. धाराशिवच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी परिमल मंगल कार्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. कैलास पाटील, संस्था अध्यक्ष विशाल घोगरे, संस्थापक एम.डी .देशमुख ,मुख्य प्रवर्तक पी.एन. चव्हाण, वसंतराव भोरे, बाळासाहेब मुंडे ,संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
आ. कैलास पाटील म्हणाले की भाई उध्दवराव पाटील शिक्षक पतसंस्थेचा कारभार राजकारण विरहित व चांगला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदरच लाभांश सभासदांना दिला जातो हे अतिशय चांगले आहे.जो देश शिक्षण व आरोग्य मोफत देतो तोच दश विकसित व सक्षम होतो. यावेळी संस्था अध्यक्ष विशाल घोगरे, संस्थापक एम.डी .देशमुख ,मुख्य प्रवर्तक पी.एन .चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. सभासदांना 9% लाभांश वाटप करण्यात आला .या सभेत 30 सेवानिवृत्त सभासदांचा सपत्नीक शाल, पुष्पहार, फेटा बांधून, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांनी भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले .सभेचे अहवाल वाचन करुन प्रश्नांची उत्तरे संस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष विशाल घोगरे यांनी तर सूत्रसंचालन संचालक बालाजी तांबे यांनी केले. या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित आमचे आभार संचालक विजयकुमार कुलकर्णी यांनी मानले.