तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानक समोरील चौकात मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी वाहतुक कोंडी निर्माण झाल्याने याचा फटका पादचारी सह वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात बसला.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात श्रावणात सातत्याने वाहतुक कोंडी निर्माण होत आहे.
एस पी ने लक्ष घालण्याची मागणी येथील वाहतुक कोंडी समस्या गेली. अनेक वर्षा पासुन जैसे थे असल्याने या वाहतूक कोंडीकडे नुतन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी लक्ष घालुन वाहतूक कोंडी समस्यावर कायम स्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे
.श्रावण मास पार्श्वभूमीवर सध्या श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविक खाजगी वाहनांनी येत असुन दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या चौकात मोठी बस वळताना चारीही रोडने वाहने आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. दुचाकी वाहन धारक ही या वाहतुक कोंडीत अडकले. तसेच घाटशिळ वाहनतळात जाणारी येणारी वाहने एकाच मार्गाने दिपक चौकात येताच येथे ही मोठी वाहतूक कोंडी सातत्याने अनेक दिवसा पासुन होते. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाहतुक कोंडी गेली अनेक वर्षा पासुन जैसे थे असुन यात नुतन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.