उमरगा (प्रतिनिधी)-विद्यमान आमदाराच्या विरोधात प्रस्तापित पक्षांपैकी कुणीही विरोधकाची भूमिका निभावली नसल्याचा पक्षावर आरोप अँड. शितल चव्हाण यांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अँड शितल चव्हाण यांनी सोमवारी दि. 19 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीतील फाऊंडेशनची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सत्यनारायण जाधव, अँड अर्चना जाधव, खाजा शेख, व्यंकट भालेराव आदि उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना अँड. शितल चव्हाण यांनी तालुक्यात विरोधकाची पोकळी भरुन काढण्याचे काम ॲड. शितल चव्हाण फाऊंडेशनने पोटतिडकीने केले असल्याचे सांगून नागरी समस्यांना वाचा फोडणे, अवैद्य धंद्यांना आळा घालण्यासाठी झटणे, निकृष्ट कामांची पोलखोल करणे, समाजात वाचन संस्कृती रुजविणे आणि जागृती घडवून आणणे अशा सर्व पातळ्यांवर फाऊंडेशनने भरीव कार्य केलेले आहे. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडताना अनुसूचित प्रवर्गातील सर्व जातीशी संवाद साधत त्यांना प्राधान्याने विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. तसेच मविआच्या प्रमुख नेत्यांनी इच्छूक उमेदवारासह मतदार संघातील लोकात विश्वासाहर्ता निर्माण करून महाविकास आघाडीच्या समविचारी व्यक्ती व संघटनेला सोबत घेऊन तातडीने विधानसभा निवडणुकीची रणनीती आखावी, उमेदवार निवडीबाबत अँड. शितल चव्हाण फाऊंडेशन सह सर्वांना विचारात घेऊन निर्णय प्रक्रियेत सामील करण्याचे आवाहन अँड. शितल चव्हाण यांनी केले.

 
Top