धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील भूमिगत गटारीचे काम हे नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागते. भूमिगत गटारीचे रखडलेले काम महाविकास आघाडीचे खासदार, आमदार व माजी नगराध्यक्षांचेच पाप आहे. या कामासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजूर केला. महिनाभरात या कामाला सुरुवात होईल, हे माहीत असताना काल महाविकास आघाडीचे खासदार, आमदार व माजी नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केले. दुसरा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे सातत्याने त्याच त्याच विषयाचे भांडवल करुन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा राजकीय डाव असल्याचा प्रतिटोला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि.4) झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. या भुमिगत गटार योजनेची शहराला गरज होती काय? असा सवालही त्यांनी केला. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरही ते बोलले, मात्र भुयारी गटार योजनेवर झालेला खर्च पाणी पुरवठ्यासाठी केला असता तर पाण्याचा प्रश्न सुटला नसता काय? असा साळुंके यांनी उपस्थित केला. आमदार कैलास पाटलांनी 108 कामांना स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. परंतु या कामांच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे नगर परिषदेला समांतर सार्वजनेिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली.
धाराशिव जिल्ह्यातील वर्ग 1 च्या जमिनी वर्ग 2 मध्ये घेतल्यानंतर अन्यायग्रस्त शेतकरी व प्लॉटधारकांनी धनंजय शिंगाडे यांच्या नेतृत्त्वात शेतकरी बचाव कृती समिती स्थापन केली. परंतु महाविकास आघाडीच्या खासदार, आमदारांनी यासाठी पाठपुरावा का केला नाही? असा प्रश्न विचारून आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी एकर जमीन युती सरकारने दिली आहे असेही साळुंके यांनी सांगितल पत्रकार परिषदेस शिवउद्योग सहकारचे जिल्हाध्यक्ष सुनील शेरखाने, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित बनसोडे, शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, रजनीकांत माळाळे, सागर कदम, अमर माळी, सौरभ निंबाळकर, सिद्धू सावंत उपस्थित होते.