धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथील विक्रांत रवींद्र देटे -पाटील हा विद्यार्थी दिनांक 7 ऑगस्ट 24 रोजी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे
विक्रांत देटे-पाटील यांचे प्राथमिक शिक्षण धाराशिव येथील तेरणा पब्लिक स्कूल येथे तर शालेय शिक्षण पुणे येथील के लाईन मेमोरियल स्कूल ऑफ पुणे येथे झाले. पुढे पुणे येथील जे. एस. पी. एम. विद्यापीठातून आयटी इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यापुढील शिक्षण अमेरिकेतील नामांकित नॉर्थ कॅरोलीना स्टेट युनिव्हर्सिटीतुन तो एमएस चे शिक्षण पूर्ण करणार आहे. तसेच शिक्षण पूर्ण करत असतानाच अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत तो आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत राहणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या भरघोस यशाचे श्रेय आई ॲड. उल्का देटे-पाटील हिला जाते असे विक्रांत याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.