धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका यांच्याकडून श्रावण सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
श्रावण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सावता फुलसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ भाग्यश्री गोंदकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. वैशाली बोबडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. स्वाती जाधव यांनी मानले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सावता फुलसागर यांनी श्रावण सोहळा उत्साहास शुभेच्छा दिल्या आणि अशाच पद्धतीने पारंपारिक सण उत्सव महाविद्यालयात शिस्तीने पाडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रावण सोहळा उपक्रमात मेहंदी स्पर्धा, केशरचना स्पर्धा, शृंगार स्पर्धा, वाचन स्पर्धा ,पाककला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा ,उत्कृष्ट मायलेक स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमानंतर विजेत्यांना डॉ. फुलसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रा.भाग्यश्री गोंदकर, डॉ. स्वाती जाधव ,डॉ.दीक्षित एस.पी.,डॉ. खापर्डे पी.आय, प्रा पवार एस एम,प्रा स्वाती बैनवाड, प्रा. हुंबे ए.के., प्रा.सुप्रिया शेटे ,श्रीमती वाघमारे एस एस, प्रा. शेख सबा,प्रा. स्वाती आकोसकर, श्रीमती राठोड जे.जी., प्रा. कोरे आर.एस, प्रा. गावीत व्ही.ए,प्रा. गेंगजे एस.एस., श्रीमती गायकवाड एस.जे., प्रा. देडे एस.एच, प्रा.डोळे एस.एम, प्रा.वाघ एस.वाय., प्रा . माधरी मगरे, प्रा. तसनिम मोमीण, सौ. मुंडे एस.बी. आदि महिला प्राध्यापक उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.