धाराशिव (प्रतिनिधी)-  ऑक्टोबर 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत पाणीटंचाई निवारणासाठी शेतकऱ्यांच्या अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिर व टँकरचे प्रलंबित 19 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्याला तात्काळ मिळण्यात यावेत. अशी मागणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, सन 2023-24 वर्षांमध्ये धाराशिव जिल्ह्यात अत्यंत कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थितीमुळे जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, उमरगा व लोहारा या आठ तालुक्यातील 101 गावांमध्ये जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी 122 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्याचप्रमाणे 371 गावांमध्ये 886 विहीर व विंधन विहीर अधिगृहण दिनांक 1 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीमध्ये केले असून मागील काळातील शासनाकडे 19 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विहीर व विंधन विहीर अधिकरण व टँकरचे पैसे प्रलंबित आहेत. सदरील रक्कम येत्या चार दिवसात संबंधितांना देण्याबाबत आदेशित करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे दुधगावकर यांनी दिला आहे.

 
Top