धाराशिव (प्रतिनिधी) - येथील शासकीय विश्राम गृहावर महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार संघटनेची महत्वपुर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार संघटनेचे संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारणी निवडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत धाराशिव तालुकाप्रमुखपदी बळीराम कांबळे, कळंब तालुकाप्रमुख पंडित देशमुख, तुळजापूर बाबासाहेब गुंड, उमरगा सचिन पाटील, लोहारा भरत पाटील, परंडा गुलाबराव शिंदे, वाशी तालुकाप्रमुखपदी विकास तळेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नुतन तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष कैलाश गोरे यांनी फोनद्वारे संघटनेचे अध्यक्ष राजेन्द्र केदार, सरचिटणीस राजेश महाडिक यांनीही नवनियुक्त तालुकाप्रमुखांना शुभेच्छा दिल्या. या निवडी मुळे जिह्यातील बांधकाम मजूर व जनरल कामगार योजना पासून वंचित राहणार नाही व त्याना न्याय देण्यासाठी जिह्यात संघटना काम करणार आहे. असे जिल्हा प्रमुख दत्ता शिंदे यांनी सांगितले.