धाराशिव (प्रतिनिधी)-कॉन्फरेडेशन ऑफ ऑल इंडिया आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड ॲग्रकिल्चर संलग्नित असलेल्या धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी महेश वडगावकर,संघटन सचिव अभिलाष लोमटे यांची तर राज्य सचिवपदी संजय मोदाणी, उपाध्यक्षपदी संजय मंत्री यांची एकमताने निवड झाली आहे.
कॉन्फरेडेशन ऑफ ऑल इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.एस.भरतीया, राष्ट्रीय महामंत्री खासदार प्रवीण खंडेलवाल, महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांच्या प्रमुख उपस्थतीित पुण्यात शुक्रवारी (दि.30) व्यापारी महासंघाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल व्यापक चर्चा करण्यात आली.त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार लक्ष्मीकांत जाधव यांची धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड जाहीर करण्यात आली.तसेच महेश वडगावकर यांची जिल्हा सचिव, अभिलाष लोमटे यांची संघटन सचिव म्हणून निवड करण्यात आली. संजय मोदाणी यांची महाराष्ट्र सचिवपदी तर संजय मंत्री यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. तसेच धाराशिव येथे वेगवेगळ्या संघटनांकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष संजय मोदाणी, मशिनरी असोसिएशनचे राजाभाऊ काळे, ज्वेलरी असोसिएशनचे कपिल शर्मा, फर्टिलायझर असोसिएशनचे संग्राम शिंदे, अभिजीत थिटे, मनोज कोचेटा, शामभाऊ भन्साळी, शैलेश मेहता, धनंजय जेवळीकर, नितीन फंड, नितीन भन्साळी, अमित मोदाणी, प्रशांत कोनारडे, मंगेश वैजापूरे, संतोष कुलकर्णी, अझहर खान, बापू शिंगाडे, जगदीश मोदाणी, विशाल थोरात, शाम बजाज यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.